व्हीलचेअरवरील चिमुरडी रुक्मिणी देहभान हरपून झाली दिंडीत सामील

49

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सोसायटी फॉर दी एज्युकेशन ऑफ दी चॅलेंज्ड’ अर्थात ‘एस.ई.सी डे’ स्कूल या आग्रीपाड्यातील शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलांच्या शाळेने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला दिंडीचे आयोजन केले होते. शिशू वर्ग ते सातवी पर्यंत शिकणारे विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. सेरेब्रल पाल्सी, पोलिओ, मल्टीपल डिसॅबिलीटी या असाध्य आजारांनी ग्रस्त असणारे हे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. टाळ, मृदुंगाच्या गजरात या विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद लुटला. व्हीलचेअरवरील रुक्मिणीच्या पेहरावातील मुलगी या दिंडीचं वैशिष्ट्य होतं. दिंडीत शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग देखील सहभागी झाला होता. आषाढी एकादशीचे महत्व या विद्यार्थ्यांना कळावे, वारकरी सांप्रदायाची माहिती त्यांना व्हावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा चाफे यांनी सांगितले.

dindi-wheelchair

आपली प्रतिक्रिया द्या