वीज खांबावरील टीव्ही केबल, दूरध्वनीच्या तारा महावितरणच्या रडारवर

72

सामना ऑनलाईन, मुंबई

वीज वितरणासाठी उभारलेल्या खांबांवर सर्रासपणे बांधल्या जाणाऱ्या टीव्ही केबल आणि दूरध्वनीच्या तारा महावितरणच्या रडारवर आल्या आहेत. वीजवाहिन्या असतानाही स्थानिक केबल चालक विजेच्या खांबावरून आपल्या केबल टाकत असल्याने प्राणांतिक हानीबरोबरच महावितरणचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच संबंधित विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.महावितरणचे राज्यभर वीज वितरणाचे जाळे आहे. त्यासाठी विजेच्या खांबावरून वीज वाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या परवानगीशिवाय खांबाला अन्य केबल किंवा तारा बांधणे बेकायदेशीर आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत शहरी भागातील केबल चालक, दूरध्वनी कंपन्यांचे कर्मचारी आपल्या केबल विजेच्या खांबाला बांधतात. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन किंवा बेकायदेशीरपणे बांधलेल्या केबल  वीज वाहिनीच्या संपर्कात आल्यास विजेचा धक्का बसल्याने सामान्य नागरिकांना प्राण गमवावा लागतो. त्याचे खापर महावितरणच्या डोक्यावर फुटते.

आपली प्रतिक्रिया द्या