टीआरपी घोटाळा- हंसाने रिपब्लिक टीव्हीला दिले 32 लाख रुपये

टीआरपी घोटाळ्याच्या तपासा दरम्यान फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हंसा रिसर्च कंपनीने रिपब्लिक टीव्हीला 32 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.

त्या 32 लाख रूपयाबाबत क्राईम ब्रँचने हंसाच्या सीईओना विचारणा केली असता त्यांनी त्या व्यवहाराबाबत माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. तर क्राईम ब्रँचने रिपब्लिक टीव्हीत गुंतवणूक करणाऱया चार कोलकाता आणि एक राजकोट येथील कंपनीच्या वरिष्ठाना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत.

टीआरपी घोटाळ्यात काही आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिटरची मदत घेतली. तपासा दरम्यान हंसा रिसर्च कंपनीने रिपब्लिक टीव्हीला 32 लाख रुपये दिल्याचे समोर आले. त्या 32 लाख रुपयाबाबत क्राईम ब्रँचने हंसाच्या सीईओना विचारणा केली असता, त्यांनी त्या व्यवहाराबाबत माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले.

हंसा रिसर्च कंपनीने त्या पैशाच्या व्यवहाराबाबतची माहिती बार्कला सांगितली नव्हती. आज मुंबई क्राईम ब्रँचची एक टीम कोलकाता येथे गेली आहे. एका गुंतवणूक दाराच्या घरी या टीमने रेड केली. दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीत गुंतवणूक करणाऱ्या चार कोलकाता आणि एक राजकोटच्या कंपनीच्या वरिष्ठांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. त्याना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे.

अभिजित देत होता रामजीला ट्रेनिंग

पोलिसांनी अभिजितकडून मोबाईल एक जप्त केला आहे. अभिजित आणि रामजी यांच्या झालेल्या 45 संभाषणाची एक क्लिप पोलिसांना मिळाली आहे. ग्राहकांच्या घरात कसे जायचे याचे अभिजित हा रामजीला ट्रेनिंग देत होता.

आपली प्रतिक्रिया द्या