कोरोनापाठोपाठ चीनमध्ये ‘हंता’ व्हायरसमुळे खळबळ, 32 जणांना लागण, एकाचा मृत्यू

6300

जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरस पहिल्यांदा चीन मधील वुहान शहरात सापडला होता. चीनमध्ये 3 हजारपेक्षा जास्त बळी घेतल्यानंतर कोरोना व्हायरस आटोक्यात येत आहे. एकीकडे कोरोना संक्रमित रुग्णात घट होत असताना आता ‘हंता’ नावाच्या व्हायरसची 32 जणांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे चीनच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 15 हजार बळी घेतले असेंउन लाखो लोकांना याची लागण झाली आहे. चीनच्या ज्या शहरातून हा व्हायरस जगभरात पसरला तेथे आता हा व्हायरस आटोक्यात येत आहे. गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र चीन बाहेर हा व्हायरस धुमाकूळ घालत आहे. चीननंतर इटली, अमेरिका, स्पेन, इराण या देशात कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहे. इटली शहरात रोज 600 ते 700 लोक मृत्यू पावत आहेत. इटलीने चीनला कधीच मागे सोडले असून सोमवारीही जवळपास 600 लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला. दुसरीकडे चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना, ‘हंता’ व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे चीनची चिंता वाढली आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने हंता व्हायरसबाबा वृत्त दिले आहे. या व्हायरसमुळे युनान प्रांतात सोमवारी एकाचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने रोजगारासाठी बाहेर पडलेल्या या व्यक्तीला ‘हंता’ व्हायरसने गाठले आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, चीनमध्ये ‘हंता’ व्हायरसचे पॉझिटिव्ह 32 रुग्ण असल्याने निष्पन्न झाले आहे. जगभरातून आता चीनवर पुन्हा लोक टिका करू लागले आहेत. याआधीही या व्हायरसमुळे बरेच लोक दगावले होते. चीनमध्ये हा व्हायरस प्रथमच पसरत आहे.

‘हंता’ व्हायरस काय आहे?
‘हंता’ व्हायरस हा उंदीर व खारुताई यांच्या संपर्कात आल्याने माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. म्हणजे उंदीर किंवा खारुताई, त्यांची विष्ठा, त्यांनी खाल्लेल्या पदार्थांच्या संपर्कात आल्याने तिथून हा व्हायरस मानवी शरीरात येतो. ‘हंता’ व्हायरसमुळे डोके दुखणे, मळमळ, अतिसार, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात. ‘हंता’ व्हायरसपासून बचावाचा मार्ग म्हणजे उंदीर व खारुताईंच्या संपर्कात न येणे.

आपली प्रतिक्रिया द्या