HappyBirthdayPujara – टीम इंडियाची नवी ‘वॉल’, जाणून घ्या पुजाराबाबात खास गोष्टी

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू राहुल द्रविड याला ‘वॉल’ असे संबोधले जायचे. विकेटवर टिकून फलंदाजी करत गोलंदाजांचा घाम काढणारा द्रविड सहजासहजी आपली विकेट फेकत नसायचा म्हणून त्याला ही उपाधी मिळाली होती. द्रविडच्या निवृत्तीनंतर त्याची कमतरता चेतेश्वर पुजारा भरून काढताना दिसत असून त्याला टीम इंडियाची ‘नवी वॉल’ अशी उपाधी मिळाली आहे. याच पुजाराचा आज वाढदिवस आहे.

चेतेश्वर पुजारा याचा जन्म 25 जानेवारी, 1988 रोजी झाला. आज त्याचा 33 वा वाढदिवस आहे. जगभरातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. बीसीसीआय आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही खास अंदाजात पुजाराला शुभेच्छा दिल्या आहेत.

गुजरातच्या राजकोट येथे जन्मलेल्या पुजाराने अल्पावधीत टीम इंडियामध्ये आपले स्थान भक्कम केले. सलामीच्या जोड्या बदलत राहिल्या, परंतु तिसऱ्या स्थानावर पुजारा कायम राहिला. द्रविडचा खरा वारस आपण आहोत हे त्याने दाखवून दिले आणि टीम इंडियाकडून एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही केला. कसोटीमध्ये एका डावात 500 चेंडू खेळणारा पुजारा टीम इंडियाचा एकमेव खेळाडू आहे.

सर्वाधिक चेंडूचा केला सामना

pujara-new1

पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एका डावात 525 चेंडू खेळून नवा विक्रम प्रस्थापित केला. पुजाराने राहुल द्रविड याचा विक्रम मोडला. द्रविडने पाकिस्तानविरुद्ध 495 चेंडूचा सामना केला होता. त्याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 491 चेंडूचा सामना केला होता. या यादीत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही नाव असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी एका डावात तब्बल 477 चेंडू खेळले होते.

20118-19 आणि 2020-21 मालिकेचा नायक

pujara-new2

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेती टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला. या विजयात चेतेश्वर पुजारा याचा मोलाचा वाटा राहिला. ऑस्ट्रेलियाच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजाचे चेंडू त्याने अंगावर झेलले मात्र विकेट सोडली नाही. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर टीम इंडियाला नाव कोरता आला. याआधी 2018-19 ला झालेल्या मालिकेत देखील चार लढतीत पुजाराने 3 शतकांच्या मदतीने 521 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाला मालिका विजय मिळवून दिला होता.

कारकीर्द

pujara-new

2010 ला पदार्पण करणाऱ्या पुजाराने आतापर्यंत 81 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 45 च्या सरासरीने 6111 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 द्विशतकांचा आणि 18 शतकांचा समावेश आहे. त्याने 28 अर्धशतकंही ठोकली आहेत. कसोटी कारकीर्दीमध्ये त्याने आतापर्यंत 13,572 चेंडूंचा सामना केला आहे. कसोटीसह त्याने 5 एक दिवसीय सामनेही खेळले आहेत. मात्र तो यात फक्त 51 धावा करू शकला. तसेच आयपीएलच्या 30 लढतीत त्याने 390 धावा केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या