#HappyBirthday बस कंडक्टर ते ‘सुपरस्टार’, वाचा रजनीकांत यांचा रोमहर्षक प्रवास

1118

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलेले अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत याचा आज वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी वयाची 69 वर्ष पूर्ण केली असून सत्तरीमध्ये प्रवेश केला आहे. वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांच्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा आतापर्यंतचा रंजक प्रवास पाहूया….

1. 12 डिसेंबर, 1950 रोजी रजनीकांत यांचा बंगळुरूमध्ये जन्म झाला. रजनीकांत याचा जन्म हेंद्रे पाटील या मराठी कुटुंबात झाला आणि त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव आणि आईचे नाव जिजाबाई गायकवाड आहे.

rajinikanth-8

2. रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बस कंडक्टर म्हणूनही काम केले. यासोबत ते नाटकामध्येही काम करायचे.

rajinikanth-5

3. रजनीकांत यांचा नाटकातील अभिनय पाहून तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बालाचंद्र प्रभावित झाले आणि 1975 ला आलेल्या ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटामध्ये त्यांना भूमिका दिली. या चित्रपटाना राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.

rajinikanth-7

4. दिसायला यथातथाच असलेल्या रजनीकांत यांची संवाद शैली प्रचंड गाजली आणि तमिळ चित्रपट भैरवीमध्ये मिळालेल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

rajinikanth-6

5. जवळपास 10 वर्ष तमिळ इंडस्ट्री गाजवल्यानंतर 1983 मध्ये रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला.

rajinikanth-4

6. 26 फेब्रुवारी 1981 रोजी रजनीकांत यांनी लता रंगाचारी यांच्याशी विवाह केला. रजनीकांत यांना सौंदर्या आणि ऐश्वर्या या दोन मुली आहेत.

rajinikanth

7. नव्वदच्या दशकामध्ये रजनीकांत यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले. यामुळे त्यांना सुपरस्टार हे बिरूद चिकटले.

rajinikanth-3

8. दाक्षिणात्य चित्रपटांसह रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट केले. 2007 साली आलेला त्यांचा ‘शिवाजी द बॉस चित्रपट’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘रोबोट’ने इतिहास रचला. तर 2018 साली प्रदर्शित झालेला ‘2.0’ चित्रपट सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट ठरला होता.

rajinikanth-2

9. रजनीकांत यांना 2000 साली केंद्र सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले. 2015 मध्ये त्यांना पद्म विभूषण हा पुरस्कार देण्यात आला.

rajnikanth9

आपली प्रतिक्रिया द्या