#HappyBirthdayYuvi हिंदुस्थानला 3 वर्ल्डकप जिंकून देणारा ‘सिक्सरकिंग’ झाला 38 वर्षाचा

557

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘सिक्सर किंग’ नावाने ओळखला जाणारा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याचा आज 38 वा वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1981 साली जन्मलेल्या युवराजने 39 व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर देखील #HappyBirthdayYuvi हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.

yuvraj4

युवराज सिंह याने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराज सिंह याने 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता. सिक्सर किंग युवराजने टीम इंडियाला तीन वेळा विश्वचषक जिंकून दिला आहे.

  • 1. युवराजने सर्वात प्रथम 1999 मध्ये झालेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत आपली छाप सोडली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडले. हा विश्वचषक टीम इंडियाने आपल्या नावावर केला.
  • 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमधील युवराजने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ठोकलेले सलग 6 षटकार त्याला खऱ्या अर्थाने ‘सिक्सर’ किंगची उपमा देऊन गेले. हा वर्ल्डकप देखील टीम इंडियाने जिंकला.
  • 2011 ला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करताना युवराजने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अफलातून कामगिरी करत 28 वर्षानंतर टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला. या वर्ल्डकपमध्ये युवराजला ‘मालिकावीर’चा किताब देऊन गौरवण्यात आले.

yuvraj

क्रिकेट कारकीर्द

  • 17 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये युवराज सिंहने 40 कसोटी, 304 एक दिवसीय आणि 58 टी-20 लढतींमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. 40 कसोटीत युवीच्या नावावर 3 शतक आणि 11 अर्धशतकांसह 1900 धावांची नोंद आहे.
  • कसोटीसह एक दिवसीय क्रिकेटमध्ये युवीने 278 डावात फलंदाजी करताना 8701 धावा चोपल्या. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 58 टी-20 लढतीत त्याच्या नावावर 8 अर्धशतकांसह 1177 धावांची नोंद आहे.
  • फलंदाजीसह गोलंदाजीतही युवीने चांगली कामगिरी केली आहे. कसोटीत 9, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 111 आणि टी-20 मध्ये 28 विकेट्स युवीने घेतल्या आहेत.

yuvraj3

अभिनेत्रीशी विवाह

युवराज सिंहचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रीशी नाव जोडले गेले. अखेर 12 नोव्हेंबर, 2015 ला युवराजने अभिनेत्री हेजलसोबत साखरपुडा केला आणि 30 नोव्हेंबर, 2016 ला दोघांचा विवाह झाला.

yuvraj2

शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर युवराज सिंह याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टर्बोनेटर हरभजन सिंग, यॉर्करकिंग जसप्रित बुमराह, विस्फोटक सलामीवीर शिखर धवन, विरेंद्र सेहवाग यांनी युवराज सिंह याच्यासोबतचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर आयसीसीने युवीने स्टुअर्ट ब्रॉडला लगावलेल्या 6 षटकारांचा व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या