संतापजनक! लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवविवाहितेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

1864
rape
प्रातिनिधिक फोटो

एकीकडे दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवण्याची तारीख निश्चित झाली आहे, तर दुसरीकडे देशात आजही राजरोसपणे महिलांवर अत्याचार सुरु असल्याचे उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या संतापजनक घटनेवरून दिसते. येथे हपूर (Hapur) जिल्ह्यात एका नवविवाहितेचे अपहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, हपूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. डीएसपी राजेश सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पीडित तरुणीचे 17 जानेवारीला लग्न झाले होते आणि लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचे अपहरण झाले. रविवारी सकाळी पीडित तरुणी अत्यावस्थ अवस्थेत सापडली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या