चटपटीत चवदार: हराभरा कबाब

161

neelima-borse

ब्लॉग: चटपटीत चवदार

>> शेफ नीलिमा बोरसे

‘भूक’ ही देवानं माणसाला दिलेली एक  अनोखी भेट आहे पण गंमत म्हणजे या भूकेला ‘चवी’चा असा तडका दिला आहे की, या चवेनं माणसाला झपाटलं आहे. भूक लागल्यानंतरही केवळ ‘चवदार’ खाण्यासाठी माणूस भूक बराच काळ थांबवून ठेवतो आणि  भला मोठा प्रवास करून एखाद्या हातगाडीवर, धाब्यावर किंवा एखाद्या हॉटेलवर खायला जातो. अशा खवय्यांसाठी आपण घरच्या घरीच चमचमीत बनवू शकलो तर? म्हणूनच मी चटपटीत पदार्थ घरीच बनवायला सुरुवात केली आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांनी, नातेवाईकांनाही त्याला दाद दिली. हे नवनवीन, चटपटीत चवदार पदार्थ सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून ‘चटपटीत चवदार’ या नावानं ब्लॉग सुरू करत आहे.

हराभरा कबाब

साहित्य:-

ओला वटाणा – १.५ वाटी
ओला हरभरा – १ वाटी
कोथिंबीर- अर्धीवाटी
बारिक किसलेले गाजर- अर्धीवाटी
शिमला मिरची- अर्धीवाटी (बारिक केलेली)
उकडलेले बटाटे- २-३ (छोटे)
मीठ- चवीनुसार
फ्राय करण्यासाठी तेल- ३ ते ४ पळी
हिरवी मिरची- २-३ (बारिक केलेली)
आलं-लसूण पेस्ट- १ चमचा
हळद- चिमूटभर

कृती:-

ओला वाटाणे आणि ओला हरभरा हा मिस्करमधून बारिक करा (थोडा जाडसर ठेवणे). त्यात बारिक केलेली कोथिंबीर, शिमला मिरची, उकडलेले बटाटे, बारिक केलेली हिरवी मिरची, आलं-लसणाची पेस्ट, चिमूटभर हळद आणि चवेनुसार मीठ टाकून छान एकत्र करा. त्याचे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवा आणि ‘शॅलो फ्राय’ करा. हरा भरा कबाब तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि चटणी किंवा सॉससोबत वाढा.

टीप: हरा भरा कबाब विविध आकारातही बनवू शकतात जसे की, हृदयाचा आकार, शंकरपाळ्याचा आकार, इत्यादी.

पदार्थ करून पाहा? कसा वाटला ते कळवा. आपल्या प्रतिक्रिया, सूचनांचं स्वागत आहे. नक्की कळवा.([email protected]) फोन क्रमांक: ८३९०३१९०७९

आपली प्रतिक्रिया द्या