भाजपच्या महिला नेत्याची सरकारी अधिकाऱ्याला चपलेने मारहाण, पाहा व्हिडीओ

2435

भाजपच्या महिला नेत्या सोनाली फोगाट यांनी हरयाणा शेतकरी मार्केट कमिटीच्या सचिवाला चपलेने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून हरयाणातील भाजप सरकारवर टीका केली आहे.

सोनाली फोगाट या 2019 च्या हरयाणा विधानसभा निवडणूकीत आमदपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढल्या होत्या. मात्र कांग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी त्यांचा पराभव केला होता. शुक्रवारी सोनाली फोगाट या हिसारमधील मार्केटमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथे मार्केट कमिटीचे सचिव सुल्तान सिंह यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर सोनाली यांनी सुल्तान सिंह यांना कानाखाली मारली. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत त्यांनी सुल्तान सिंह यांना चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत सुल्तान सिंह हे सोनाली यांना थांबविण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र संतापलेल्या सोनाली यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.

या प्रकरणी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारवर टीका केली आहे. सुरजेवाला यांनी या घटनेचा व्हिडीओही ट्विट केला आहे. ‘खट्टर सरकारच्या नेत्यांचे घटिया कारनामे. मार्केट कमिटीच्या सचिवाला जनावरांना मारहाण हिसार की भाजप नेता. सरकारी नोकरी करणं अपराध आहे का? खट्टर साहेब आता काही कारवाई करणार का?’, असा सवाल त्यांनी या ट्विटमधून केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या