आणखी एका क्रिकेटपटूला काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता

नवज्योतसिंग सिद्धू (काँग्रेस) अमृतसर-एकूण उत्पन्न-९.९० कोटी

सामना ऑनलाईन। चंडीगड

भाजपामधून बाहेर पडलेल्या माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांना काँग्रेसकडून पंजाब विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांचं तिकीट किंवा काँग्रेस पक्षप्रवेश निश्चित झाला नाहीये मात्र  त्याचवेळी आणखी एक क्रिकेटपटू काँग्रेस कडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

siddhu-and-harbhajan

टर्बनेटर किंवा भज्जी या टोपणनावांनी प्रसिद्ध असलेला हरभजन सिंग हा काँग्रेसकडून जालंधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी नवज्योतसिंह सिद्धूची बायको नवज्योत कौर यांनी काँग्रेसकमध्ये प्रवेश केला आहे. सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.

सिद्धूने बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ३० मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली, मात्र चर्चेनंतरही सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का याचं उत्तर मिळू शकलं नाही.

चंदीगड महानगरपालिकेची नुकतीच निवडणूक झाली ,ज्यामुळे भाजपा आणि शिरोमणी अकाली दलाने २६ पैकी २१ जागा जिंकल्या. यानिकामुळे सिद्धू यांनी काँग्रेसप्रवेश लांबवल्याचीही चर्चा सुरू आहे. सिद्धू यांनी भाजपा सोडून वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला. आपने आणि काँग्रेसने त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. काँग्रेसला त्यांची पत्नी नवज्योत कौर हिला पक्षात घेण्यात यश मिळालं असलं तरी सिद्धू काय करणार हे एक मोठं प्रश्नचिन्हच आहे.