युवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. पाकिस्तानात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विरोधातील लढ्यासाठी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याने पुढाकार घेत तेथील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आफ्रिदीच्या ट्रस्टकडून दररोज वेगवेगळ्या भागातील गरजूंना किराणा सामान दिले जात आहे. शाहिद आफ्रिदिने या कामासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्याला मदत व्हावी म्हणून टीम इंडियाचे माजी खेळाडू हरभजन सिंग व युवराज सिंग यांनी व्हिडीओद्वारे आफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कायम हिंदुस्थानविरोधी वक्तव्य करणाऱ्या आफ्रिदीसाठी केलेले हे आवाहन नेटकऱ्यांना रुचले नसून त्यांनी युवराज व हरभजनला ट्रोल केले आहे.

शाहिद आफ्रिद कायम हिंदुस्थानविरोधात गरळ ओकत असतो. त्यामुळे हिंदुस्थानींमध्ये त्याच्याविरोधात प्रचंड राग आहे. त्यात देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाही पाकड्यांच्या सीमेवरील कुरघोड्या काही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे हरभजन व युवराजचे आफ्रिदीच्या ट्रस्चला मदत करण्याचे आवाहन नेटकऱ्यांना रुचलेले नाही. त्यांनी या दोन्ही स्फोटक खेळाडूंना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या