गायिका हार्ड कौरचा खलिस्तानवाद्यांना पाठिंबा; हिंदुस्थान, मोदींविरोधात ओकली गरळ

722

गायिका आणि रॅपर हार्ड कौर हिच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हार्ड कौर हिने खलिस्तानवाद्यांना पाठिंबा देत ‘खालिस्तान जिंदाबाद’ घोषणाबाजी केली. तसेच हिंदुस्थान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. व्हिडीओमध्ये ती एका बससमोर अश्लिल चाळे करतानाही दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हार्ड कौर कारमधून उतरते आणि आपल्या साथिदाराला शूटिंग करण्यास सांगते. रस्ता ओलांडून ती एका बससमोर जाते. या बसवर ‘न्यू इंडिया’ असे लिहिलेले आहे. यानंतर ती हिंदुस्थान आणि मोदी सरकारविरोधात अपशब्द वापरते आणि अश्लिल चाळे करू लागते. हार्ड कौर हिंदुस्थानला ‘बलात्काऱ्यांचा देश’ बोलताना दिसते. यानंतर शेवटी ती खलिस्तानला पाठिंबा देणारी घोषणाबाजी करताना दिसते. हार्ड कौरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टिकेचे आसूड ओढले आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये हार्ड कौर खलिस्तान समर्थकांसोबत उभी असल्याचे दिसत आहे. हार्ड कौर खलिस्तानवाद्यांना पाठिंबा देताना दिसते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात चुकीच्या शब्दांचा वापर करते. तसेच जुन्या खटल्यांचा उल्लेख करताना मोदी आणि शहा यांना आव्हान देते. मला धमकी मिळत असून मी कोणाला घाबरत नसल्याचे हार्ड कौरने म्हटले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने हार्ड कौरला देशातून हाकलून देण्याची मागणी केली आहे.

वादाशी जुने नाते
हार्ड कौर आणि वाद यांचे जुने नाते आहे. काही दिवसांपूर्वी हार्ड कौरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर तिच्याविरोधात कलम 124 ए, 153 ए, 500, 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

hard

आपली प्रतिक्रिया द्या