हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच त्याने पत्नी नताशासोबत घटस्फोट घेतला आणि चार वर्षानंतर ते विभक्त झाले. या चर्चा ताज्या असतानाच आता हार्दिक पांड्या एका विदेशी गायिकेला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
प्रसिद्ध ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत सध्या हार्दिक पांड्याचे नाव जोडले जात आहे. शिवाय दोघांनी एकत्र सुट्ट्या देखिल घालवल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याने ज्या ठिकाणचे फोटो शेअर केले आहेत त्याच ठिकाणचे जस्मिन वालियाने फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे दोघांचे हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. जस्मिन वालिया हिचे नाव हार्दिक पांड्या याच्यासोबत जोडल्यापासून ती जास्त चर्चेतआली आहे.