हार्दिकसाठी ‘ही’ अभिनेत्री पोहोचली दक्षिण आफ्रिकेला

30
 सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. पांड्या आता त्याच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री एली अवरामसोबत सध्या हार्दिकचं नाव जोडलं जात आहे. हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्याच्या लग्नातही एली आली होती. मात्र एली आता दक्षिण आफ्रिकेते पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा हार्दिक-एली यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.
एली इतर खेळाडूंच्या पत्नीसोबत आफ्रिकेत सध्या मजा-मस्ती करताना दिसली. शिखर धनवची मुलगी रेहाच्या १३ वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही एली दिसली. त्यामुळे विराट-अनुष्का, जहीर-सागरिका, युवराज-हेझल यांच्यानंतर हार्दिक-एली अशी लव्हस्टोरी समोर आली असल्याचंही बोललं जात आहे. हार्दिक पांड्याचं नाव अभिनेत्री परिणीत चोप्रासोबतही नाव जोडलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या