‘हार्दिक’ अभिनंदन! टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू होणार बाबा, फोटो केला शेअर

2107

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बाबा होणार आहेत. रविवारी सायंकाळी त्याने ही खुशखबर आपल्या चाहत्यासोबबत शेअर केली. पंड्याने इन्स्टाग्रामवर पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) हिच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यात नताशा गर्भवती असल्याचे दिसते.

फोटोसोबत पंड्याने चाहत्यांना खुशखबर देताना सांगितले की, नताशा आणि माझा आजपर्यंतचा प्रवास शानदार झाला आणि हा प्रवास आणखी चांगला होणार आहे. आम्ही नव्या जीवाचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आमच्या आयुष्यात नवीन चेहरा येणार असून तुमची प्रार्थना आणि आशीर्वाद यांची आवश्यकता आहे. यासोबत पंड्याने काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोवरून त्यांनी नुकतेच लग्नही उरकून घेतल्याचे दिसतेय. मात्र याबाबत त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

screenshot_2020-05-31-20-12-44-282_com-android-chrome

नवीन वर्षाला दिले होते सरप्राईज
नवीन वर्षाच्या सुरुवातीला हार्दिक आणि नताशा यांनी अचानक साखरपुडा करत सर्वांना अचंबित केले होते. पंड्याने भर समुद्रात एका बोटीवर नताशाला अंगठी घालतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

विराटने केले अभिनंदन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने हार्दिक पंड्या याचे अभिनंदन केले आहे. तुम्हा दोघांना शुभेच्छा. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या नवीन सदस्याला खूप सारे ओरम आणि आशीर्वाद, असे ट्विट कोहलीने केले. कोहलीसह फिरकीपटू युझवेंद्र चहल यानेही ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले.

screenshot_2020-05-31-20-12-52-060_com-android-chrome_copy_700x450

आपली प्रतिक्रिया द्या