टी-20 वर्ल्डकपसाठी हार्दिक पांड्याची निवड झालीच कशी, दिग्गज खेळाडूचा संताप

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने आपल्या तुफानी फलंदाजी आणि कामचलावू गोलंदाजीच्या बळावर आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला. पांड्या एक असा खेळाडू आहे जो कधीही उलटफेर करू शकतो. त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानला त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र त्याच्या फिटनेसवरून सध्या वाद सुरू असून टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने यावर संताप व्यक्त केला आहे.

टीम इंडियाचे माजी खेळाडू सबा करीम यांनी यूएई आणि ओमानमध्ये होऊ घातलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी हार्दिक पांड्या याची निवड कशी झाली असा सवाल उपस्थित केला आहे. कारण हार्दिक पांड्याचा फिटनेस खराब असून यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या उर्वरित सत्रात तो अद्याप मैदानात उतरलेला नाही. मुंबईचे अद्याप पाच सामने बाकी आहेत, मात्र पांड्या यात खेळणार की नाही याबाबत स्पष्टता नाही.

सबा करीम यांनी यूट्यूबवरील शो ‘खेलनिती’वर बोलताना म्हटले की, हार्दिक पांड्या टीम इंडियाचा मोठा खेळाडू आहे. परंतु वर्ल्डकपसाठी त्याची निवड झाली तेव्हा तो फिट होता का हा महत्त्वाचा सवाल आहे. तो फिट असेल तर त्याची निवड योग्य आहे. परंतु त्याने मुंबई इंडियन्सकडून एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला दुखापत झालीय का? वर्ल्डकपसाठी निवड सुरू असताना की आयपीएलच्या तयारीदरम्यान त्याला दुखापत झाली? या गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात.

तसेच हार्दिक पांड्या हा दुखापतग्रस्त असेल तर राष्ट्रीय संघात त्याची वर्णी कशी लागली? बीसीसीआयचा नियम आहे की एखादा खेळाडू फिट नसेल तर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये जावे लागते आणि आपला फिटनेस सिद्ध करावा लागतो. त्याशिवाय तुमची संघात निवड होत नाही, असेही सबा करीम म्हणाले.

IPL 2021 केकेआरच्या ‘या’ खेळाडूत युवराज सिंहची झलक दिसते, माजी खेळाडूचं मत

दरम्यान, पांड्या मुंबई इंडियन्सकडून का खेळत नाहीय याबाबत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनाही विचारण्यात आले. मात्र तो कधी खेळणार याबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. पांड्याचा फिटनेस सुधारत असून तो स्पर्धेच्या अखेरच्या लढतींमध्ये खेळताना दिसेल असे ते म्हणाले.

तापट स्वभाव, BCCI शी पंगा; टीम इंडियाच्या ‘अनलकी’ खेळाडूच्या कारकिर्दीला लागला ब्रेक

आपली प्रतिक्रिया द्या