हार्दिक पांड्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, नीता अंबानींनी घेतली भेट

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. पांड्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. लंडनमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर रिलायन्स फाऊंडेशनची अध्यक्ष आणि मुंबई इंडियन्सची सहमालकीन नीता अंबानी यांनी त्याची भेट घेतली.

पांड्या गेल्या एक वर्षापासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. एका वर्षात तो तिसऱ्यांदा लंडनमध्ये उपचारासाठी गेला. लंडनमधील उपचारादरम्यान तो सोशल मीडियावरही सक्रीय होता आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट आपल्या चाहत्यांना, पाठीराख्यांना देत होता. गुरुवारी त्याने नीता अंबानी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला.

लंडनमध्ये मला भेटल्याबद्दल खूप धन्यवाद वहिनी. तुमच्या शुभेच्छा आणि उत्साह वाढवणाऱ्या बोलणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही नेहमची प्रेरणादायक राहिल्या आहेत, अशी पोस्ट पांड्याने सोशल मीडियावर केली. याआधी स्पोर्टस समिटसाठी लंडनमध्ये गेलेल्या नीता अंबानी यांनी गेल्या 10 वर्षात मुंबई इंडियन्सने अनेक तरुण खेळाडूंची कारकीर्द बनवली. यात हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, बुमराहसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, असे म्हटले होते.

hardik-pandya

मंगळवारी पांड्याने एक शस्त्रक्रियेनंतरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो रुग्णालय्चाय बेडवरून उठून हळूहळू चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर तो व्हिलचेअरवर बसतो.

दरम्यान, टीम इंडियाच्या मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज आगामी चार महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याला 12 ते 16 आठवड्यांचा आराम सांगितला आहे. आयपीएल आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप पूर्वी तो फिट होऊन संघात पुनरागम करेन अशी आशा आहे.

pandya

आपली प्रतिक्रिया द्या