पांड्या, राहुलवर निलंबनाची कारवाई; वन-डे मालिकेतून बाहेर

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. चौकशी संपेपर्यंत दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एक दिवसीय मालिकेला मुकणार आहेत. तसेच आगामी विंडीज दौऱ्यावर टांगती तलवार आहे.

गुरुवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुलवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली होती. यावेळी त्यांनी पुढील निर्णय डायना एडूल्जी यांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर घेतला जाईल असेही सांगितले होते. आता एडूल्जी यांनी कायदेशीर सल्ला घेत दोन्ही खेळाडूंना पुढील कारवाईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी एडूल्जी यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांचे उदाहरण देत लैंगिक शोषणाचे आरोप लगावल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी पीटीआयला राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चौकशीपर्यंत दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एक दिवसीय मालिकेला दोन्ही खेळाडू मुकणा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या