‘पंड्या’ची विकेट पडली, २७ डिसेंबरला फाईव्ह स्टार वेडिंग

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा भाऊ मुंबई इन्डिअन्सचा फिरकीपटू कुणाल पंड्याची ‘विकेट’ पडली आहे. २७ डिसेंबर रोजी तो गर्लफ्रेंड पंखुडी शर्मासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हा सोहळा मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रंगणार आहे, अशी माहिती एका संकेतस्थळानं दिली आहे.

डिसेंबर महिना म्हणजे लग्नांचा सिझन मग क्रिकेटपटू तरी कसे मागे राहणार. विराट-अनुष्का यांच्या लग्नानंतर आता कुणाल-पंखुडीनं झटपट लग्न आटोपून घेण्याचं ठरवलं आहे. त्या दोघांचे डेटवरचे फोटो आधीच व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर दोघांच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रेमाची सुरुवात एका मैत्रीतूनच झाली होती. एका मित्रानेच या दोघांची ओळख करून दिली होती. त्या पहिल्या भेटीतच दोघेही घायाळ झाले आणि प्रेमाला रंग चढत गेला.

पंखुडी शर्मा गेली पाच वर्ष मुंबईत राहते आणि एका फिल्म मार्केटिंग कंपनीसाठी काम करत होती. मात्र गेल्यावर्षी तिनं काम सोडून दिले होतं.