पाळत ठेवायला मी गुन्हेगार आहे का?

36
hardik patel

सामना प्रतिनिधी । गांधीनगर

मी कोणाला भेटतो, काय चर्चा झाली हे भाजपला जाणून घ्यायचे आहे. भाजप घाबरली आहे. त्यासाठी माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. पाळत ठेवायला मी गुन्हेगार आहे का? प्रजासत्ताक हिंदुस्थानातील नेत्यांवर पाळत ठेवणारे राज्य गुजरात आहे का, असा सवाल करीत पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला.

अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कथित भेट घेतल्याची चर्चा आहे. हॉटेलमधील सीसी टीव्ही फुटेज व्हायरल केले आहे. यावर विविध वृत्तवाहिन्यांशी बोलताना हार्दिक पटेल यांनी भाजपला फटकारले. भाजप घाबरली आहे. भाजपला जाणून घ्यायचे आहे की मी कोणाला भेटतो, काय चर्चा झाली. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. मला लोकांना भेटण्याचा अधिकार आहे. मी काय गुन्हेगार आहे का, असा सवाल त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या