‘सीडी’ भाजपवर उलटल्या; ट्विटरवर हार्दिक यांचे गीत

51
hardik patel

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या विरोधात एकापाठोपाठ एक व्हायरल होऊ लागलेल्या ‘सीडीज’ भाजपवर उलटू लागल्या आहेत. त्या सीडीजना हार्दिक पटेल यांनी आज १९७० च्या दशकातील ‘गोपी’ या हिंदी चित्रपटातील ‘रामचंद्र कह गये सियासे’ या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवरील नव्या गीतातून प्रत्युत्तर दिले.

हार्दिक पटेल यांनी आपले गीत ट्विटरवर झळकवले असून ते चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे. त्यावरून भाजप आणि पटेल समाज यांच्यातील घमासान आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

गुजरातच्या जनतेला २२ वर्षांच्या तरुणाची नव्हे तर २२ वर्षांत आपल्या राज्याच्या झालेल्या विकासाची सीडी पाहायची आहे असा टोला हार्दिक यांनी भाजपला लगावला आहे.

श्रीराम कह गये सिया से
ऐसा कलियुग आएगा
गोडसे का मंदिर बनेगा
तंबू में राम विराजा जाएगा
मार ना सका एक अंग्रेज को
वो गांधी मार के हिंदू कहलाएगा
जो निभा ना सका पत्नी से
दुसरो की CD बनवाएगा
बांटेगा हिंदू को मुस्लिम से
दलित को भी खा जाएगा
गाय को कहकर अपनी मां
उसका मांस तक बेच खाएगा

आपली प्रतिक्रिया द्या