कुंभमेळा 12 वर्षांनीच का भरतो? जाणून घ्या, काय आहे कारण…

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. 83 वर्षानंतर पहिल्यांदाच कुंभमेळा 12 वर्षांऐवजी 11 वर्षांच्या अंतराने घेण्यात येणार आहे. कुंभमेळावा दर 12 वर्षांनी चार पवित्र नद्यांपैकी एकाच्या काठावर साजरा केला जातो. ज्यात हरिद्वारमधील गंगा, उज्जैनमधील शिप्रा, नाशिकमधील गोदावरी आणि अलाहाबादमधील त्रिवेणी संगम या नदीनाचा समावेश आहे.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा बृहस्पति कुंभात प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी कुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळ्याची पौराणिक मान्यता अमृत मंथनशी संबंधित आहे.

देव आणि असुरानी समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून प्रकट होणारी सर्व रत्ने आणि वस्तू वाटून घेण्याचा निणर्य केला होता. समुद्राच्या मंथनातून निघालेले सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे अमृत, ते मिळविण्यासाठी देव आणि असुर यांच्यात संघर्ष सुरु झाला. असुरांपासून अमृत वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी ते अमृताने भरलेले पात्र आपल्या गरुडाला दिले. असुरांनी अमृताने हे पात्र गरुडापासून हिसकावून घेण्याचा प्रत्यन केला, त्यावेळी या पात्रातील काही थेंब अलाहाबाद, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे पडले. तेव्हापासून प्रत्येक 12 वर्षांच्या अंतराने या स्थानांवर कुंभमेळा भरवला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या