प्रसिद्ध वकील हरीश साळवे 65 व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे

देशातील नावाजलेले वकील हरीश साळवे पुढील आठवड्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. 65 वर्षीय हरीश साळवे यांनी गेल्या महिन्यात 38 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट दिला होता.

हरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे यांना दोन मुली आहेत. मात्र आता हे दोघे एलमेकांपासून वेगळे झाले असून हरीश साळवे 28 ऑक्टोबरला लंडनमधील एका चर्चमध्ये विवाह करणार आहे. कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्याशी ते लग्न करणार असून दोघांचाही हा दुसरा विवाह आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हरीश साळवे यांनी धर्मांतर केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते कॅरोलिन हिच्यासोबत नियमित लंडनमधील चर्चमध्ये जात आहेत. व्यवसायाने कलाकार असणाऱ्या कॅरोलिन हिचे वय 56 असून त्यांना वर्क मुलगी देखील आहे.

चीफ जस्टीस शरद बोबडे आणि हरीश साळवे यांनी नागपूर मधील एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. 1976 ला साळवे दिल्लीला आले आणि बोबडे मुंबईला. नंतर बोबडे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले, तर साळवे ज्येष्ठ वकील आणि सिनियर सॉलिसीटर झाले.

साळवे यांनी कुलभूषण जाधव प्रकरणासह अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणात हिंदुस्थान सरकारची बाजू मांडली आहे. कुलभूषण प्रकरणात त्यांनी फी म्हणून फक्त 1 रुपया घेतला होता. तसेच देशातील नामांकित उद्योजक आणि कंपन्यांची बाजूही ते न्यायालयात मांडताना दिसले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या