आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यावर चहा विकण्याची वेळ का आली ?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

काही दिवसांपूर्वी हरीश कुमार याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलं होतं. जकार्ता इथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने देशाला कांस्य पदक मिळवून दिल्याने त्याचं कौतुक केलं जात होतं. पदक जिंकून आल्यानंतर हारतुरे स्वीकारल्यानंतर हरीशला दुसऱ्या दिवशी चहाच्या टपरीवर जावं लागलं. इतर राज्यातील सरकारं पदक विजेत्या खेळाडूंना शाबासकी म्हणून सरकारी नोकरी, बक्षिस देतात मात्र हरीशच्या नशिबात हे काहीच आलं नाही ज्यामुळे त्याला पुन्हा चहा विकावा लागतोय.

हरीशने किक व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात देशाला कांस्य पदक मिळवून दिलं आहे. अत्यंत गरीब घरातून आलेल्या हरीशचे वडील रिक्षा चालवून पूर्वी कुटुंब चालवायचे. हरीश मोटा झाल्यावर त्याने चहाच्या टपरीवर काम करायला सुरुवात केली. पदक मिळाल्यानंतर आपलं आय़ुष्य बदलेल या विचाराने त्याने जीवतोड मेहनत केली आणि देशाला पदक मिळवून दिलं. मात्र पदक मिळाल्यानंतरही आपल्या परिस्थितीत काहीच फरक पडला नसल्याचं हरीशने सांगितलं आहे. पदक जिंकल्यानंतर दिल्ली सरकारकडून आपल्याला बक्षिस स्वरुपात काही रक्कम मिळेल अशी हरीशला आशआ होती, मात्र आजपर्यंत केजरीवाल सरकारने त्याची दखल घेतलेली नाहीये.