हरियाणाने दिल्ली लागतच्या सीमा केल्या सील; गाड्यांच्या रांगा, मजुर रस्त्यावर

999

दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहून हरियाणा सरकारकडून पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल विज यांनी पुन्हा एकदा हरियाणा सीमा सील करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत विज यांनी गृहसचिवांना पत्र लिहिले आहे.

अनिल विज म्हणाले की, हरियाणामधील 80 टक्के कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे दिल्ली सीमाभागातील जिल्ह्यांमधील आहेत, त्यामुळे आम्ही दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील करत आहोत.

बुधवारी हरियाणामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 123 नवीन प्रकरणे नोंद करण्यात आल्यानंतर राज्यात कोविड -19 पासून संक्रमित लोकांची संख्या 1504 झाली आहे. राज्य आरोग्य विभाग म्हणाले की, राज्यात सध्या 604 सक्रिय प्रकरणे आहेत.

कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता हरियाणा सरकारने दिल्ली-गुरुग्राम सीमा बंद केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प दिसून येत आहे. सकाळी शेकडो लोकांना दिल्ली-गुरुग्राम सीमेवर थांबविण्यात आले. त्यानंतर परप्रांतीय मजुरांनी धरणे आंदोलन सुरू केले.

स्थलांतरित मजुरांचा रोष आहे की, गाड्यांची तपासणी न करता त्यांना सोडले जात होते, तर स्थलांतरित मजुरांना रोखले जात आहे. सायकलवरून जाणाऱ्या लोकांना का थांबविले जात आहे, कार चालकांना चौकशीविना परवानगी दिली जात आहे, असा प्रश्न प्रवासी मजुरांनी उपस्थित केला.

सायकलस्वार मजुर संतप्त झाले आणि त्यांनी रस्ता रोखला. गोंधळामुळे लांबच लांब रांग लागली. रस्त्यावर मोठा जमाव जमल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि लोकांना घरी परत पाठविण्याचा प्रयत्न करताना दिसले. दिल्ली-गुरुग्राम सीमेवरच्या घटनेनंतर तब्बल तासाभरानंतर सीमा सील करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या