Video – कॅच ऑफ द इयर! हरलीनने पकडलेल्या कॅचवर सचिन तेंडुलकरही फिदा

हिंदुस्थानचा महिला संघ हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुक्रवारी या दोन्ही संघांत पहिला T20 मुकाबला झाला. या मुकाबल्यात हिंदुस्थानी संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्याच्या निकालापेक्षा जास्त चर्चा झाली ती हरलीन देओलने पकडलेल्या कॅचची. क्रिकेटरसिकांप्रमाणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या कॅचची तारीफ केली आहे.

19 व्या षटकांत एमी जोन्सचा षटकार खेचायचा प्रयत्न केला. हरलीनने सीमारेषेच्या आधी कॅच पकडला मात्र त्यावेळी तिचा तोल जात होता. आपण सीमारेषेपलिकडे गेलो तर इंग्लंडला 6 धावा मिळतील हे हरलीनला माहिती होतं. यामुळे तिने चेंडू पुन्हा हवेत उडवला आणि सीमारेषेपलिकडे गेल्यानंतर पुन्हा तोल सारवत जबरदस्त उडी मारत सीमारेषेच्या आधी कॅच पकडला. हरलीनच्या या अप्रतिम कॅचची तारीफ इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनीही केली.

पहिल्या T20 सामन्यातही हिंदुस्तानी संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिका यापूर्वीच आपल्या खिशात घातली आहे. इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना 20 षटकांत 177 धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस पद्धतीने हिंदुस्थानी संघाला 8.4 षटकांत 73 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. हिंदुस्थानी संघ या 8.4 षटकांत फक्त 54 धावाच करू शकला.

आपली प्रतिक्रिया द्या