सावधान! शाम्पू,साबणामुळे होतो कॅन्सर

50

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

जर तुम्ही सुगंधी साबण, पर्फ्युम, डिओ आणि शाम्पूचे शौकीन असाल तर वेळीच सावध व्हा. कारण थोड्या वेळासाठी तुम्हाला फ्रेश ठेवणारी ही सौंदर्य प्रसाधने आरोग्यास घातक असून यांच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात सौंदर्य प्रसाधनांमुळे कॅन्सर होत असल्याचे आढळले आहे.

अमेरिकेत कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या एका संस्थेने एक प्रयोग केला .यात कॅन्सरच्या रुग्णांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद यांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी सुगंधी साबण, पर्फ्युम, डिओ आणि शाम्पूची आवड असलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत कॅन्सरला सर्वाधिक बळी पडत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ते वापरत असलेल्या शाम्पू आणि इतर सौंदर्य प्रसाधनांची चाचणी करण्यात आली. यात साबण आणि शाम्पू,लिप बाम, क्रीममध्ये ४ डायऑक्सन नावाचे घातक रसायन असल्याचे संशोधकांना आढळले. या रसायनांचा मानवी शरीराशी संबंध आल्यास नाक, यकृत आणि स्तनांचा कॅन्सर होतो. तर काही सनस्क्रीन, लिप बाममध्ये ऑक्सीबेंजॉन नावाचे घातक रसायन वापरले जाते. ज्याच्या परिणाम हार्मोन्सवर होतो. ज्यामुळे व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे संशोधकांना आढळले.

रंगीबेरंगी नेलपॉलिश, नेल रिमूव्हर, लिप बाम यात विषारी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे जी व्यक्ती यांचा सर्वाधिक वापर करते त्याला भविष्यात कॅन्सरचा धोका निर्माण होतो. तसेच हँण्ड सॅनिटायझर, डिओ, लहान मुलांचे नॅपकिन, क्रीम, लोशन यामध्येही फेनोग्जीथनोलचा वापर होतो. ज्यामुळे भविष्यात त्या व्यक्तीस त्वचेच्या आजारांबरोबरच कॅन्सरही होतो, असे या संशोधनात पुढे आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या