हर्षवर्धन कपूर बनणार अभिनव बिंद्रा

79

सामना ऑनलाईन, मुंबई

ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राच्या जीवनावर आधारीत चित्रपट येणार असून या चित्रपटात अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर काम करणार आहे. चित्रपटामध्ये अभिनव बिंद्राच्या वडीलांची भूमिका अनिल कपूर करणार असल्याची सध्या चर्चा आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

२००८ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनवने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. अभिवन बिंद्राची हर्षवर्धनने नुकतीच भेट घेतली आणि त्याच्याकडून त्याच्याबद्दल माहिती मिळवायला सुरूवात केली. या पहिल्या भेटीचा फोटो हर्षवर्धनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या