कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

427

देशभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात कोरोनाचा सामुहिक संसर्ग पसरत नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे. तसेच देशाची लोकसंख्या पाहता आपण कोरोना फैलावास आळा घातल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी शुक्रवारी सांगितले. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर पोहचल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच देशात कोरोनाचा सामुहिक संसर्ग नसल्याचे स्पष्ट करत चिंता करू नये, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

देशभरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असला तरी काही दिलासादायक बाबी समोर येत आहेत. देशात कोरोनाचा सामुहिक संसर्ग पसरलेला नाही. तसेच देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते 63टक्क्यांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. तर कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 2.72 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. त्यामुळे संक्रमितांचे लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. देशभरात दररोज 2.7 लाख कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. आपली लोकसंख्या पाहता देशात सामुहिक संसर्ग रोखण्यात आपल्याला यश आले आहे, ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. काही भागात कोरोना प्रसाराचा वेग वाढला आहे. त्या भागांवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या