‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं

62

सामना ऑनलाईन। मुंबई

चांगल्या मित्रांची साथ असेल तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटाचा तुम्ही सहज सामना करू शकता, असे म्हटले जाते. पण आता यावर हॉवर्ड विद्यापीठानेही शिक्कामोर्तब केल्याने ‘हर एक फ्रेंड जरुरी होता है ‘हे खरं ठरलं आहे. जीवनात आनंदी राहायचं असेल तर पैसा व संपत्तीपेक्षा चांगले मित्र बनवा असं या संशोधनातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे आपल्या आयुष्यातील मित्र-मैत्रिणींचं स्थान काय यावर हॉवर्डच्या संशोधकांनी तब्बल ८० वर्ष संशोधन केलं. यासाठी १९३८च्या नैराश्याच्या काळातील २३८ मित्रांचा अभ्यास केला गेला.

friends

सर्वात अधिक कालावधी घेतलेलं संशोधन म्हणूनही त्याची वैद्यकिय विश्वाने नोंद केली आहे. यात तुमचे मित्र-मैत्रिणींशी जितके सृद्ढ संबंध असतील तितके तुमचे आयुष्य संतुष्ट असल्याचं संशोधकांना आढळून आलं. या संशोधनात अमेरिकेचे दिवंगत माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि वॉशिंग्टन पोस्टचे संपादक बेन ब्रेडली यांचाही समावेश करण्यात आला होता. या दोघांची अतूट मैत्री, त्यांचे स्वास्थ, त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, विवाह व नंतरचा काळ यांचा अभ्यास करण्यात आला होता. यावेळी केनेडी व ब्रेडली यांनी एकमेकांना पडत्या काळात खरी साथ दिल्याची व अप्रिय घटनेतून एकमेकांना बाहेर काढण्यासही मदत केल्याचे समोर आले. केनेडी आणि ब्रेडली यांच्यातील चांगल्या मैत्रीमुळेच हे शक्य झाल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

मित्रांसमोर आपण मन मोकळे करतो. यामुळे तणाव येत नाही आणि जर तुम्हांला तणावच नसेल तर तुम्ही नक्कीच आनंदाने जगू शकता. हेच या संशोधनात निदर्शनास आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच चांगले मित्र तुमच्या सोबत असतील तर तुमच्या आयुष्याला निराशा स्पर्शही करू शकत नाही हे देखील या अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या