हरयाणा विधानसभा निवडणूक, 89 लाख तरुण मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार

voting

महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे 40 पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या 89 लाखांहून अधिक असून निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याच तरुण मतदारांना डोळय़ांसमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी आपली प्रचार रणनीती आखली होती.

हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी सोमवारी मतदान होत असून 1169 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग अग्रवाल यांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 40 वर्षे वयोगटाखालील मतदार 89 लाख 42 हजार 668 आहेत. यात 18 किंवा 19 वय असलेल्या म्हणजेच नवमतदारांची संख्या 3 लाख 82 हजार 446 आहे, तर 20 ते 29 वयोगटातील मतदार 40 लाख 67 हजार 413 आहेत. तसेच 44 लाख 92 हजार 809 मतदार 30 ते 39 वयोगटातील आहेत. राज्यात मतदारांचे सर्वाधिक प्रमाण फरिदाबाद आणि गुडगाव जिह्यात, तर सर्वात कमी मतदार पंचकुला जिह्यात आहेत. सेवा मतदारांची संख्या 1 लाख 70 हजार आहे.

वयोगट मतदार
18 ते    19 3,82,446
20 ते    29 40,67,413
30 ते   39 44,92,809
40 ते   49 35,67,536
50 ते   59 27,90,783
60 ते   69 17,39,664
70 ते    79 8,22,958
80 वर्षांपुढील 4,18,961

आपली प्रतिक्रिया द्या