तुटवडा असताना हरयाणा, आसाम, राजस्थानमध्ये लस वाया; महाराष्ट्रात झीरो वेस्टेज

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यात औषधं, ऑक्सिजन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचाही तुटवडा जाणवत आहे.  असे असताना देशातील तीन राज्यात सर्वाधिक लसी वाया जात आहे, त्यात हरयाणा, आसाम आणि राजस्थान या तीन राज्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण हे शून्य टक्के इतके आहे.

एप्रिल महिन्यात रजस्थानमध्ये सर्वाधिक लस वाया गेल्या होता. केंद्र सरकारेन जारी  सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक लस हरयाणामध्ये वाया गेल्या आहेत, त्यांचे प्रमाण 6.49 टक्के इतके आहे. तर त्यानंतर आसाममध्ये 5.92 टक्के तर राजस्थानमध्ये 5.68 टक्के लस वाया गेल्या आहेत.

राजस्थाननंतर मेघालयमध्ये सर्वाधिक लस वाया गेल्या आहेत. त्यांचे प्रमाण 5.67 इतके आहे. बिहारमध्ये 5.2 टक्के, मणिपूरमध्ये 5.19 टक्के तर पंजाबमध्ये 4.94 टक्के लस वाया गेल्या आहेत.

दरम्यान महाराष्ट्रासहन अनेक राज्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे.

आपली प्रतिक्रिया द्या