कुत्र्यामुळे कुत्र्यासारखी भांडणे, 9 जण जखमी

हरयाणामध्ये कुत्र्यामुळे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. या हाणामारीत तब्बल 9 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दयाराम हे पानीपत जिल्ह्यात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. घरासमोर एका कुत्रा घाण करत होता. तेव्हा दयाराम यांच्या आईने कुत्र्याला झाडूने मारून हुसकावून लावले. तेव्हा 20 ते 25 जण दयाराम यांच्या घरावर लाठ्या काठ्या घेऊन आले आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. यात तब्बल 9 जण जखमी झाले. एकाचे बोट तोडले असून महिलांनाही मारहाण करण्यात आली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी मारताना धारदार शस्त्रांचाही वापर केला असे तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या