हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी JJP ला झटका, चार आमदारांनी पक्षाला केला रामराम

Dushyant Chautala

हरयाणात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. पण त्यापूर्वी राज्याचे राजकारण तापले आहे. कारण पूर्वी सत्ताधारी असलेला पक्ष जननायक जनता पक्षाला घरघर लागली आहे. या पक्षाच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे.

2019 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा जेजेपीला 10 जागा मिळाल्या होत्या. जेजेपीने भाजपला पाठिंबा दिला होता. पण 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि जेजेपीची युती तुटली. आता जेजेपीची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

हरयाणा विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 1 ऑक्टोबरला हरणायात मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

देवेंदर सिंह बबली, ईश्वर सिंह, रामकरण आणि अनूप धानकक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री धानक यांनी 16 ऑगस्टला पक्षाला रामराम ठोकला आहे. माजी मंत्री देवेंदर सिंह बबली म्हणाले की गेली पाच वर्ष मी पक्ष आणि सरकारसाठी काम केले. आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे मी राजीनामा देत आहे. पुढे काय करायचं हे जनता, माझे सहकारी आणि समिती ठरवेल असे बबली म्हणाले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारांनी पक्ष सोडल्याने पक्षाची चिंता वाढली आहे. 2019 साली पक्षाला 10 जागा मिळाल्या होत्या तर 14.09 टक्के मतं मिळाली होती.