गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोरोना संकट काळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण उपचारास शहरांत येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांत नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावेत अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात मंत्रालयात विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली.

कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत.पण आता हे रुग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो.यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी गरिबांना सहकार्य करून,त्यांची सेवा करावी,अशा सूचना विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केल्या.यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर.एन.लहा,सहसचिव नितीन जिवणे,धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्य. अधिकारी सुधाकर शिंदे,तसेच बॉम्बे,जसलोक, लिलावती,हिरानंदानी,सैफी,बिच कँडी,नानावटी, रहेजा,हिंदुजा,नायर,रिलायन्स,एसआरसीसी, गुरूनानक,मसीना,ग्लोबल,प्रिन्स अली खान,एच. एन.रिलायन्स अशा विविध धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

-नियमाप्रमाणे दहा टक्के रुग्णांना मिळणार अगदी मोफत उपचार.
– ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना दिलासा .
– मोठ्या हॉस्पिटलमधूनही मिळणार गोरगरिबांना वैद्यकीय सेवा.

आपली प्रतिक्रिया द्या