लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिमांप्रती रोष वाढला

14

सामना ऑनलाईन। ब्रिटन

ब्रिटनमधील लंडनब्रिज दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिकांमध्ये अचानक मुस्लिम समाजाबदद्ल रोष वाढला आहे. मुस्लिम जिथे दिसतिल तिथे त्यांच्यावर हल्ले होत आहेत. पीटरबरो येथील फेनगेट भागात तीन वर्षाच्या मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा बुरखा एकाने फाडला व तिला रस्त्यावर ढकलले. तसेच एके ठिकाणी कुटुंबासमवेत बाहेर निघालेल्या एका मुस्लिम व्यक्तीला कारबाहेर खेचून अज्ञातांनी लाथाबुक्कयांनी मारहाण केली.

ब्रिटनमधील मॅनचेस्टर आणि लंडन ब्रिजवरील दहशतवादी हल्ल्यात ३० जण ठार झाले आहेत. हे हल्ले मुस्लिम समाजातील हल्लेखोरांनी केल्याने या समाजाबद्दल सामान्यांच्या मनात व्देष निर्माण झाला आहे. स्थानिकांमध्ये मुस्लिमांबद्दल असंतोष पसरला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना एका अज्ञाताने धमकीवजा पत्र पाठवले होते. यात त्याने एका मुस्लिम शाळेची बस उडवण्याची धमकी दिली होती तसेच मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे बंद करावे असेही नमूद केले होते. त्यानंतर पीटरबरो येथे मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा बुरखा फाडून तिला एका पुरूषाने रस्त्यावर ढकलले. तर कुटुंबासोबत बाहेर जाणाऱ्या मुस्लिम व्यकतीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून वंशभेदातून हे हल्ले होत असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या