Video – शाह- योगींच्या प्रतिमांचे दहन करून हाथरस घटनेचा काँग्रेसने केला निषेध

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाधक्काबुक्की करण्यात आली आहे. याचाच चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. स्थानिक गांधी चौकात झालेल्या नारेबाजी आंदोलनात स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जोरदार घोषणाबाजीच्या मध्यात खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. भाजप सरकारने राहुल गांधींना रोखल्यास देशाच्या प्रत्येक घरातून गांधी निघेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पीडित परिवाराला भेटण्यासाठी जाणे हा आमचा अधिकार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार घाबरले असल्यामुळेच हा प्रकार होत असल्याचे खासदार धानोरकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या