वाडिया रुग्णालयातील गैरव्यवहाराबाबत बैठक घ्या; हायकोर्टाची सूचना

275

वाडिया ट्रस्टद्वारे आर्थिक गैरव्यवहार होत असेल तर तो सरकार आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच होतोय. त्यामुळे या गैरव्यवहाराबाबत व्यवस्थापकीय बोर्डासोबत 12 फेब्रुवारी रोजी बैठक घ्या आणि त्यावर तोडगा काढा अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दिल्या.

मुंबईतील जेरबाई वाडिया व नौरोसजी वाडिया या दोन्ही रुग्णालयांना शासनाकडून तसेच पालिकेमार्फत निधी मिळत नसल्याने रुग्णांना सेवा न देण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या रुग्णालयांना निधी देण्यात यावा अशी मागणी करत ऍड. दीपेश सिसोदिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी राज्य सरकारने कोर्टाला सांगितले की, या गैरव्यवहारासंदर्भात सरकार स्वतः बैठकीपूर्वी रुग्णालयाला 5 फेब्रुवारीला भेट देईल. त्यासाठी हायकोर्टाने परवानगी द्यावी. हायकोर्टाने राज्य सरकारची ही मागणी मान्य केली.

आपली प्रतिक्रिया द्या