लातूरमधील घर फोडून 1 लाख 10 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास

589

लातूर शहराच्या पश्चिमेकडील म्हैसूर कॉलनी येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 10 हजार 400 रुपयांचा ऐवज पळवला.

या चोरी प्रकरणी महंमद इब्राहीम चौधरी राहतात म्हैसूर कॉलनी यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्यांनी 17 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते 18 ऑगस्ट रोजी 7.30 या कालावधीत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरले. कपाट फोडून कपाटातील 34 ग्रॅम चे सोन्याचा नेकलेस (किंमत 75000 हजार रुपये),7 ग्रॅमचे सोन्याचे वनपिस (किंमत 15400 हजार रुपये), तसेच रोख रक्कम 20 हजार रुपये असा ऐवज पळवून नेला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक डी.जे. पाटील हे करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या