मधुमेहींसाठी ‘रामबाण’ असलेल्या तेजपत्ताचे जाणून घ्या फायदे….

3758

जगभरात मधुमेहींची सर्वाधिक संख्या हिंदुस्थानात आहे. आकडेवारीनुसार 2019 पर्यंत देशातील मधुमेहींची संख्या 7.7 कोटीवर पोहचली होती. मधुमेहींना कोरोना संक्रमण आणि इतर रोगांचे संक्रमण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे मधुमेहींनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. शरीरातील साखर नियंत्रित करण्यासाठी तेजपत्ता रामबाण उपाय आहे. तेजपत्तामुळे मधुमेहींच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होतेच, त्याचप्रमाणे याचे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे आहेत.

टाइप 2 मधुमेहींना तेजपत्ताचा चांगला उपयोग होतो. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही तेजपत्ता उपयोगी आहे. तेजपत्तामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील सफेद पेशींचे (व्हाइट ब्लड सेल) प्रमाण योग्य राखण्यास मदत करते. या पेशी शरीरातील रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तेजपत्ताच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतीकारक शक्ती वाढते. तसेच विटामिन ए आणि विटामिन सी डोळ्यांसाठीही उपयुक्त आहेत.

पचनासंबधीच्या समस्या असल्यास तेजपत्तामुळे त्या कमी होतात. गॅसेस, अॅसिडिटी, पोटात मुरडा मारणे, अपचन यासारख्या समस्या कमी करण्यासाठी तेजपत्ताचा आहारात समावेश करावा. चहा उकळताना त्यात तेजपत्ता टाकल्यास चहा चविष्ट होतो. त्यामुळे चहात टाकूनही तेजपत्ता घेता येतो. झोप येत नसल्यास किंवा निद्रानाशाची समस्या असल्यास तेजपत्ताच्या तेलाचे दोन थेंब पाण्यात टाकून ते पाणी घ्यावे, त्यामुळे शांत झोप येते. किडणीसंबधित समस्या असल्यास तेजपत्ता पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर घ्यावे. त्यामुळे मुतखडा आणि किडणीसंबंधित आजारांचा त्रास कमी होतो. डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होत असल्यास तेजपत्ताच्या तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो. त्यामुळे आहारात तेजपत्ताचा वापर करणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या