दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ नका कॉफी, नाहीतर होऊ शकतं नुकसान!

1855

बऱ्याचशा महिला व पुरुष आपल्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. यामध्ये अनेक जण असेही आहेत जे कॉफी मिळत नाही, तोपर्यंत आपल्या दिवसाची सुरुवात करत नाही. कॉफी आपल्याला ऊर्जा देते आणि दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवते. कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते, परंतु प्रत्यक्षात आपण कॉफी कमी प्रमाणात आणि योग्य वेळेस सेवन केल्यासच त्याचे आरोग्याला फायदे होतात. ऐकताना तुम्हाला विचित्र वाटेल मात्र कॉफी पिण्याचीही एक योग्य वेळ असते. तुम्ही त्यावेळेनुसार कॉफी प्यायलात तर तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतेही आजार होणार नाहीत.

सकाळी उठताच…

झोपेतून उठताच जर तुम्हाला कॉफी पिण्याची सवय असेल, तर ही सवय आजच बदला. सकाळी उठल्याबरोबर कॉफीचे सेवन केल्याने शरीरात असलेल्या कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढते. कॉर्टिसॉल आपली रोगप्रतिकार शक्ती, चयापचय (मेटॅबॉलिक) प्रक्रिया आणि तणाव प्रतिसाद नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असतो. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कॉफी प्यायल्यास तुमच्या शरीरात तणावाचे प्रमाण वाढते.

रिकाम्या पोटी नाही

रिकाम्या पोटी कधीही कॉफी पिऊ नका. जर आपण बराच वेळ काही खाल्ले नसेल तर अशा वेळी कॉफी पिऊ नका. असे केल्यास तुम्हाला अॅसिडिटी, अल्सर, बद्धकोष्ठता आणि पोटांच्या अनेक समस्यांना सामोरे जायला लागू शकते. या सोबतच रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते ज्यामुळे छातीत जळजळ होते.

व्यायाम करण्यापूर्वी…

व्यायाम करण्यापूर्वी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. व्यायाम करण्याच्या अर्धा तास आधी कॉफी प्यायल्याने तुमची चयापचय क्षमता वाढते आणि यात असलेल्या कॅफिनमुळे तुमच्या शरीराची उर्जा वाढवते. मात्र हे लक्षात ठेवा की आपण केवळ एकच कप कॉफी प्या. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या