बदाम नेहमी सोलून खावे, जाणून घ्या काय आहे कारण…

आपल्याला लहानपणापासून नेहमीच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदामचे नियमित सेवन केल्याने बुद्धी तल्लख होते.

मात्र बदाम सोलून खावेत की न सोलता खावेत? यावर बऱ्याच लोकांचे दुमत आहे. बरेच लोकं फक्त घाईघाईत सालासकटच बदाम खातात. यामुळे त्यांना बदामाचा पुर्णपणे लाभही मिळत नाही. बदामाचे साल पचायला खुप जड असते.

बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा एन्झाईम असतो. यामुळे पोषक घटक शरीरात पुर्णपणे शोषले जात नाहीत. म्हणूनच बदाम नेहमी सोलून खावेत. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना निर्मला ठाकूर यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या