पिस्ता दूधासोबत घेतल्याने होतात ‘हे’ फायदे…वाचा सविस्तर…

गायीचे दुध चांगले की म्हशीचे दुध चांगले हा प्रश्न नेहमी विचारला जातो. जाणून घेऊया गाय आणि म्हशीच्या दुधात काय फरक असतो आणि कोणाचे दुध जास्त आरोग्यदायी असतं.

शरीराला आवश्यक असणारी सर्वच पोषकतत्वे आहारातून योग्य प्रमाणात मिळत नसल्याने शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि घटक मिळण्यासाठी अनेकजण सुकामेवा वापरतात. या सुका मेव्यातील अनेकांचा आवडता घटक म्हणजे पिस्ता. पिस्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, पिस्ता दुधासोबत घेतल्यास ते आरोग्यासाठी हितकारक ठरते. पिस्ता दुधासोबत वृद्धांना आणि मुलांना दिल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

पिस्ता दुधासोबत घेण्याचा सर्वाधिक फायदा पुरुषांना होतो. अनेक पुरुष उत्तेजकता वाढवण्यासाठी विविध औषधे घेतात. त्याचा शरीरावर दुष्परीणाम होतो. मात्र, पिस्ता दुधासोबत घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि उत्तेजकता आणि शक्ती वाढते. तसेच शरीरात टेस्टोस्टेरॉन नावचे हार्मोन्स वाढवण्यास पिस्ता आणि दुधाने मदत होते. त्यामुळे पुरुषांची शक्ती वाढते. हृदयरोग दूर ठेवण्यासाठी दूधासोबत पिस्ता खाणे फायदेशीर आहे. दूध आणि पिस्ता एकत्र घेतल्याने कार्डियोप्रोटेक्टिव्ह अॅक्टविटीमुळे हृदयाचे विविध आजारपासून संरक्षण होण्यासाठी कवच तयार होते. त्यामुळे हृदयरोग दूर ठेवण्यासाठी दूधासोबत पिस्त्याचे सेवन करावे.

अंगमेहनत आणि क्रीडाप्रकारात कौशल्य मिळवण्यासाठी मांसपेशी मजबूत असणे गरजेचे असते. मांसपेशी किंवा हाडे कमजोर असल्यास अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी मांसपेशी आणि हाडे मजबूत करण्यासाठी दूधासोबत पिस्ता घेण्याचाही फायदा होतो. दूध, पिस्ता आणि त्यासोबत बदाम घेतल्यास शरीरात नव्या पेशींची निर्मिती होण्यास मदत होते त्यामुळे हाडे मजबूत होतात. पिस्ता आणि दूधात विटामिन ए जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. दृष्टीदोष सुधारण्यासाठी नियमित पिस्ता आणि दूध घेण्याचा फायदा होतो. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी मीठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असलेले पदार्थांचे सेवन करावे. दूध आणि पिस्त्यामध्ये हे दोन्ही घटक असल्याने याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या