साळेल येथील आरोग्य शिबिरात ८५ रुग्णांची तपासणी

26

सामना ऑनलाईन । मालवण

माधवबाग मुंबई आणि समता मित्र मंडळ साळेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारीआरोग्य तपासणी शिबीर आणि व्याख्यानाचे आयोजन साळेल मधलीवाडी येथील प्रकाश साळकर यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. या शिबिरात चौके पंचक्रोशीतील ८५ रुग्णांनी मोफत तपासणीस सहभाग दर्शवला.

यावेळी डॉ. पल्लवी पाटील यांनी ‘हृदयरोग : समज आणि गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सौ. कोरगावकर, वैभव पालकर, विशाल जाधव, मिहील अहिर, अश्विनी पालव आदी माधवबाग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग दर्शवला. यावेळी उद्योजक बाळा तावडे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

शिबीर यशस्वीतेसाठी समता मित्र मंडळ अध्यक्ष रवींद्र साळकर, सचिव बाळा तावडे, माजी सरपंच कमलाकर गावडे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष रामचंद्र धनावडे, सचिव जयकुमार राणे, पोलीस पाटील रवींद्र गावडे, नारायण गावडे, भानजी गावडे, बाबुराव गावडे, शिवराम गावडे, ग्रामपंचायत उपसरपंच सर्वेश्वरी गावडे आदीनी सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या