वरळीत आरोग्य शिबिराचे आयोजन; महागडय़ा शस्त्रक्रिया मोफत होणार

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरळीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने लायन ताराचंद बापा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या सौजन्याने हृदय बायपास, अँजिओप्लास्टी, लेसर थायरॉईड शस्त्रक्रिया, मेंदूवरील शस्त्रक्रिया, आयव्हीसी फिल्टर (लेग), थ्रोम्बोलिसिस (पाय) अशा शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. 12 आणि 13 जूनपर्यंत ही आरोग्यसेवा देण्यात येईल.

उपचारावेळी लागणारी इतर कोणतीही तपासणी 50 टक्के सूट दरात करण्यात येणार आहे. रुग्ण महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड धारक असावा. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा विभाग अधिकारी संकेत सावंत, युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांनी केले आहे. संपर्क – 8879202077.