Can Dettol kill Coronavirus? ‘डेटॉल’मुळे कोरोना बरा होतो? कंपनीचा मोठा खुलासा

8697
dettol-corona

Can Dettol kill Coronavirus? विविध प्रकारच्या किटाणूंमुळे होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी तुम्ही वेगवेगळे साबण, लिक्वीड सोप वापरत असतात. अनेक जाहिरातीतून आपला साबणच कसा किटाणूंना मारक ठरतो हे लोकांवर बिंबवले जाते. डेटॉल हे यामध्ये अग्रगण्य नाव आहे. डेटॉल सध्या एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. चीनसह पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. अशातच डेटॉलच्या बाटलीवर कोरोना व्हायरसवर उपायकारक असल्याचा दावा केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अखेर कंपनीला याप्रकरणी उत्तर द्यावे लागले आहे.

ब्रिटनची वेबसाईट ‘द सन’च्या माहितीनुसार, काही स्टोअर्समधील डेटॉलच्या बाटलीवर कोरोना व्हायरसवर मात करण्यास उपयोगी असे लिहिलेले आढळले. लोकांनी त्याचे फोटो घेतले आणि सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली. काही डब्ब्यांवर तर उत्पादनाची तारीख 2019 असल्याचे स्पष्ट दिसत होते. तेव्हा अनेकांनी प्रश्न करण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये कोरोना व्हायरसची ओळख जगाला झाली, असे असताना देखील डेटॉलच्या बाटलीवर आधीच कोरोनाचे नाव कसे काय छापले गेले? कंपनीला या व्हायरसबद्दल आधीच माहिती होती का? असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीचे धाबे दणाणले आहे.

रेकिट बेंकिजेर नावाची एक कंपनी डेटॉलचे उत्पादन करते. कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस संदर्भात आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. तसेच कोरोना संदर्भात डेटॉलचे टेस्टींग देखील करण्यात आलेले नाही असेही सांगण्यात आले आहे.

चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वप्रथम आढळले. 1700 हून अधिक रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. तर जगभरात 50 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 11 हजारांहून अधिक लोक बरे झाल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या