मुळा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

आज आम्ही तुम्हाला मुळा खाण्याचे काय फायदे आहेत, याबद्दल माहिती सांगणार आहोत. मुळ्यापासून कोशिंबीर, भाजी, पराठे, पुऱ्या असे पदार्थ घरात तयार केले जातात. काहीवेळा कच्चा मुळा खाणंही अधिक फायदेशीर असतं.

मुळ्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस आणि लोह असतं. त्यामुळे तुम्हाला डायबेटीस, रक्त कमी असेल, ऍनिमिया यांसारख्या अनेक आजारांवर फायदेशीर आहे. मुळ्यात अ जीवनसत्त्व, ब आणि क जीवनसत्त्वही पुरेशा प्रमाणात असतात. हिवाळ्यात मुळा सहज उपलब्ध होणारं असल्यानं त्याचं सेवन आवश्यक करावं.

रंगाने पांढरा शुभ्र पण चवीला तिखट, बराचसा उग्र आणि थोडासा कडवट चवीचा मुळा अनेक औषधी गुणधर्मानी युक्त आहे. बाराही महिने उपलब्ध असणारा मुळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.

हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. मुळा पचनासाठी उपयुक्त असून गॅसेस कमी करण्यास मदत करतो. सर्दी-सायनस सारख्या व्याधीतही मुळा खाल्ल्यास आराम पडतो. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या