सावधान! दुधाच्या पिशवीसोबत तुम्ही घरी कोरोना तर आणत नाहीय ना? अशी घ्या काळजी

3213

कोरोनाच्या या संकटकाळात लोक काळजी घेताना दिसत आहेत. बाहेर फिरताना, बाहेरून घरी येताना, किंवा एखादी वस्तू आणताना सावधानता बाळगली जात आहे. तोंडावर मास्क लावले जात असून हात साबण, सॅनिटायझरने स्वच्छ धुतले जात आहेत. मात्र अनावधानाने तुम्ही कोरोना घरी आणत नाहीय ना हे देखील महत्वाचे आहे.

याबाबत आता खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (एफएसएसएआय) माहिती दिली असून प्लास्टिकच्या पिशवीत दूध आणताना आणि उकळून घेताना काय काळजी घ्यावी याबाबत सांगितले आहे. दुधाची पिशवी आणायला जाताना तुम्ही आणि दुधाची पिशवी विकणाऱ्या व्यक्तीने मास्क घालणे बंधनकारक आहे. पाहूया खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने आणखी काय काळजी घेण्याबाबत सांगितले आहे.

– बाजारातून दुधाची पिशवी आणल्यानंतर लगेच वापरू नका. दुधाची पिशवी नळाखाली धरून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

– पाण्याने धुवून तुमचे समाधान झाले नाही तर दुधाची पिशवी साबणाने धुवा. मात्र जर पाण्याने पिशवी धुतली तर त्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवून घ्या.

– दुधाची पिशवी धुतल्यावर साबणाने हात धुवा आणि कात्रीने कापून पिशवीतील दूध एका भांड्यात काढून घ्या.

– मात्र दूध भांड्यात ओतत असताना दुधाच्या पिशवीला बाहेरच्या बाजूने लागलेले पाणी त्यात पडू देऊ नका. यासाठी तुम्ही कपड्याने आधी पिशवी पुसून घ्या.

– पिशवीतील दूध प्रक्रिया केलेले असल्याने सामान्य दिवसात तुम्ही ते उकळी न येता किंवा न तापवता देखील वापरू शकता. मात्र कोरोना काळात चांगली उकळी आल्यावरच वापर करा.

 

आपली प्रतिक्रिया द्या