हिंदुस्थानात कोरोनाचा सामुहिक संसर्ग नाही, 10 लाखांमध्ये 538 रुग्ण – डॉ. हर्षवर्धन

555

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण आढळण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही दिवसेदिवस वाढत आहे. या परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी देशात कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्येबाबत आपण जगभरात तिसऱ्या स्थानावर असलो तरी लोकसंख्येचा विचार करता आपण कोरोना फैलावावर चांगल्याप्रकारे नियंत्रण ठेवले आहे. 10 लाखांमध्ये 538 कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉ हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित देशांच्या यादीत देश तिसऱ्या स्थानावर आल्याने जनतेत चिंता वाढत आहे. मात्र, फक्त आकडेवारी बघून चिंतित होण्याची गरज नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने आपण जगात दुसऱ्या स्थानवर आहोत. आपल्या देशाच्या लोकसंख्येनुसार कोरोना प्रसाराचा विचार करण्याची गरज आहे. जगभरातील इतर देशात 10 लाखांमध्ये कोरोनाचे 1453 रुग्ण आहेत. तर हिंदुस्थानात 10 लाखांमध्ये कोरोनाचे 538 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसून काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे जनतेने पालन करावे, असेही ते म्हणाले. देशात कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील काही भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. मात्र, देशात कोणत्याही भागात सामुहिक संसर्ग झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या